Tirupati Prasadam Controversy: तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांची चरबी आढळल्यानंतर देशभरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या घटनेच्या निषेधार्थ "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "सनातन धर्माबाबत गेल्या 5-6 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची विटंबना सुरू आहे. सूमारे 219 मंदिरांची विटंबना करण्यात आली."
आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुपती लाडू घटनेचे प्रायश्चित करण्यासाठी 11 दिवसांच्या ‘प्रयाश्चित्त दीक्षा’अंतर्गत मंगळवारी सकाळी विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात शुद्धीकरण विधी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भगवान बालाजीकडे क्षमा मागत 11 दिवस उपवास करण्याची शपथ घेतली.
लवकरच घोषणा करणारमीडियाशी बोलताना पवन कल्याण म्हणाले की, "अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि त्यावर वेळोवेळी बोलले पाहिजे. सनातन धर्माबाबत गेल्या 5-6 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची विटंबना सुरू आहे. 219 मंदिरांची विटंबना करण्यात आली. रामतीर्थम येथे तचर श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे हा फक्त एकट्या तिरुपती प्रसादाचा मुद्दा नाही. 'प्रयाश्चित दीक्षा' सनातन धर्माला पुढे नेण्यासाठीची कटीबद्धता आहे. ही दीक्षा पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक घोषणाही करणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.
'तिरुपती'मधील भेसळीचा तपास एसआयटीने थांबवलाआंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणाले की, तिरुपती लाडू भेसळ प्रकरणातील SIT तपास तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे असे करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकतेच प्रसादात भेसळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांच्या सूचनेनुसार, तिरुपती लाडू प्रसादम भेसळ प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने 3 ऑक्टोबरपर्यंत तपास तात्पुरता स्थगित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.