- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अध्यक्ष ममता बॅनर्जी या सध्या भाजप, काँग्रेससह इतर पक्षांतील नेते आपल्या पक्षात घेण्याच्या मोहिमेवर असल्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मोठ्या प्रयत्नांना सुरुंग लागेल.काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या रविवारी संपलेल्या बैठकीत काँग्रेस-तृणमूल काँग्रेसची मैत्री कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दिसले. टीएमसीच्या नेत्यांनी आसाम, गोव्यातील दोन प्रमुख काँग्रेस नेत्यांना आपलेसे केले. बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांना पक्षात आणून त्यांना राज्यसभेची जागा दिली. याचप्रमाणे त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरिओ यांना पक्षात आणून राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा बॅनर्जी यांनी निर्णय घेतला. सीडब्ल्यूसीच्या नेत्यांनी रविवारी बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी म्हणाले की, “बॅनर्जी यांचा अनेक काँग्रेस नेत्यांना पळवून नेण्यामागील हेतू हा काँग्रेस (ममता) निर्माण करून त्यांच्याविरोधात काँग्रेसला (आय) लढवण्याचा आहे.” टीएमसी हा भाजपची बी टीम म्हणून काम करीत असल्याचेही वक्तव्य चौधरी यांनी केले.
ममता बॅनर्जींच्या खेळीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:15 AM