शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:03 IST

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत. 

Abhishek Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय चर्चांना वेग आला आहे. मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका पार पाडणार आहेत का? त्यांना पुढच्या पिढीकडे राजकारण सोपवायचे आहे का? असे  प्रश्न सध्या कोलकात्यापासून दिल्लीपर्यंतच्या लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत. 

डायमंड हार्बरचे खासदार पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे विधान राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांनी केले आहे. दरम्यान, कुणाल घोष यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.  सत्ताधारी पक्ष घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कुणाल घोष यांनी त्यांना चांगले आरोग्य, विशेषत: त्याच्या डोळ्यांशी संबंधित समस्या बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, अभिषेक बॅनर्जी यांच्या पक्षातील योगदानाचेही कुणाल घोष यांनी कौतुक केले.

कुणाल घोष यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की," अभिषेक बॅनर्जी यांनी अगदी लहान वयातच आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. मी राजकारणात सक्रीय राहो की नाही, या उगवत्या ताऱ्याला मी जवळून पाहीन. अभिषेक तरुण आहेत, पण जोपर्यंत मी टीएमसीमध्ये सक्रिय आहे, तोपर्यंत ते माझे नेता आहेत. राजकारणापलीकडेही मला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे. मी ममता बॅनर्जी यांना वर्षानुवर्षे नेतृत्व करताना पाहिले आहे, आणि आता मी अभिषेक यांना  उदयास येताना पाहत आहे."

कुणाल घोष पुढे म्हणाले की, "अभिषेक बॅनर्जी काळानुसार अधिक परिपक्व होत आहेत, आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ करत आहेत, आपल्या कौशल्यात अधिक सुधारणा करत आहेत. अभिषेक हे एक दिवस पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होतील आणि तृणमूल काँग्रेसला एका नव्या युगात घेऊन जातील. ते ममता बॅनर्जींच्या भावना आणि वारशाचे प्रतीक आहेत." दरम्यान, अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. त्यामुळे कुणाल घोष यांच्या दाव्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य नसले तरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.

भाजप, माकपाकडून टीकाकुणाल घोष यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, 'तृणमूल काँग्रेस हा लोकांचा पक्ष नाही, तो एक कौटुंबिक व्यवसाय आहे. ते वारसा म्हणून मुख्यमंत्रिपद सोपवण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम बंगालमधील लोक अशा घराणेशाहीला कंटाळले आहेत आणि खरे प्रतिनिधित्व शोधत आहेत. दुसरीकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) नेते सुजन चक्रवर्ती यांनीही टीएमसीवर कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्री