तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर, डेकॅथलॉन या स्पोर्टिंग ब्रँडविरोधात तक्रार केली आहे. महुआ या त्यांच्या वडिलांसाठी ट्राउजर्स खरेदी करण्यासाठी दिल्ली एनसीआरमधील अन्सल प्लाझा येथील शोरूममध्ये गेल्या होत्या. तेथे खरेदी दरम्यान आलेला अनुभव त्यांनी ट्विटरवर शेअर केला आणि स्पोर्टिंग ब्रँडच्या वृत्तीवरही आक्षेप नोंदवला आहे.
महुआ मोइत्रा यांनी त्यांच्या वडिलांसाठी ट्राउजर्स खरेदी केल्या होत्या. त्यांना बिलिंग काउंटरवर फोन नंबरसंदर्भात आणि ईमेल आयडीसंदर्भात विचारणा करण्यात आली. यानंतर संतापलेल्या महुआ यांनी त्यांचा संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी देण्यास नकार दिला आणि स्टोअरमधूनच ट्विट केले. यात, डेकॅथलॉन गोपनीयता आणि ग्राहक कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महुआ ट्विट मध्ये म्हणाल्या, 'मला वडिलांसाठी अंसल प्लाझा येथेली डिकॅथलॉन इंडियामधून कॅश देऊन 1499 ची ट्राउज खरेदी करायची आहे. मात्र, येथील मॅनेजर माझ्यावर मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी देऊन खरीदारी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. आपण गोपनीयता आणि ग्राहक कायद्याचे उल्लंघन करत आहात. मी अद्यापही स्टोअरवरच आहे.
यानंतर, काही वेळातच महुआ यांची पोस्ट व्हायरल होऊ लागली. नंतर महुआ यांनी सांगितले, की मॅनेजरने अपला मोबाइल नंबर त्या कॉलममध्ये टाकला आणि त्यांना ट्राउजर देल्या. यानंतर महुआ यांनी संबंधित मॅनेजरचे कौतुकही केले. मात्र, याच वेळी डिकॅथलॉनने नियमांचे पालन करायला हवे, असेही त्या म्हणाल्या.