दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत आपचा पराभव झाला तर भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर आता नंबर आहे बिहारचा आणि नंतर पश्चिम बंगालचा. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकत्रितपणे I.N.D.I.A. च्या बॅनरखाली निवडणूक लढली असती, तर कदाचित भाजपला यावेळीही संधी मिळाली नसती, असे बोलले जात आहे. कारण, दिल्लीतील अनेक मतदारसंघांत काँग्रेसला एवढी अधिक मते मिळाली की, मुख्यमंत्री आतिशी वगळता आपच्या सर्वच दिग्गजांचा पराभव झाला.
यानंतर आता, टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅर्जी यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी निवडणुकीसंदर्भातील चर्चेसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "आम्ही विरोधकांच्या व्यापक हितासाठी I.N.D.I.A. सोबत आहोत. मात्र, काँग्रेसला पुढे जाण्याचा मार्ग शोधावासा वाटत नसेल अथवा जागावाटपात सहभागी होण्याची त्यांची इच्छा नसे, तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास तयार आहोत.
अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढू. यात कुठलीही नवी गोषट नाही. आम्ही 2014, 2016, 2019 आणि 2024 मध्ये स्वतंत्रपणे लढलो होते आणि जजिंकलोही. आम्ही पुन्हा एकदा तोच निकाल गिरवून."
तत्पूर्वी, सोमवारी ममता बनर्जी आपल्या सर्व आमदारांशी संवाद साधतान म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस एवढ्या मजबूतस्थितीम नाही की, विधानसभा निवडणुकीत त्यांचा टीएमससी वर काही परिणाम होईल...