शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

तंबाखू, सिगारेट पाकिटांवर इशारा दुप्पट मोठा

By admin | Published: September 30, 2015 12:56 AM

बाजारात विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावर येत्या १ एप्रिलपासून धोक्याचा चित्ररूपी व शब्दरूपी वैधानिक इशारा सध्याहून दुप्पट आकाराचा छापावा लागणार आहे.

नवी दिल्ली : बाजारात विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावर येत्या १ एप्रिलपासून धोक्याचा चित्ररूपी व शब्दरूपी वैधानिक इशारा सध्याहून दुप्पट आकाराचा छापावा लागणार आहे.सध्या तंबाखू व सिगारेटच्या पाकिटांच्या दोन्ही बाजूंना ४० टक्के जागेवर तंबाखूपासून आरोग्यास होणाऱ्या अपायांचा धोका स्पष्ट करणारा वैधानिक इशारा छापावा लागतो. १ एप्रिलपासून पाकिटाच्या दोन्ही बाजूंची ८५ टक्के जागा अशा इशाऱ्यासाठी द्यावी लागेल. यापैकी ४० टक्के जागेवर तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊन पूर्णपणे सडलेले तोंड, गाल वा चेहरा यासारखे चित्र असेल. २० टक्के जागेवर ‘तंबाखूने कर्करोग होतो’, ‘तंबाखू प्राणघातक आहे’, ‘तंबाखू म्हणजे मृत्यूशी गाठ’ अशा प्रकारचा शाब्दिक इशारा इंग्रजी व हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत छापावा लागेल. ‘सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स (पॅकेजिंग अँड लेबलिंग) रुल्स, २००८’नुसार यासंबंधीची अधिसूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केली. हा नवा नियम १ एप्रिल २०१६पासून लागू करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे बंधन आयात केली जाणारी सिगारेटची पाकिटे व चघळून खाण्याच्या तंबाखूच्या पाकिटांनाही लागू असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क) ----------राजस्थान उच्च न्यायालयाने रेटा लावल्याने केंद्राने घाईघाईत ही नवी अधिसूचना जारी केली. केंद्र सरकारने मोठ्या वैधानिक इशाऱ्याची अंमलबजावणी २९ सप्टेंबरपर्यंत करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी दिले होते.