ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी २०१६ - १७ चा अर्थसंकल्प आज संसदेत मांडला असून तंबाखूजन्य पदार्थ, लक्झरी कार्स तसेच ब्रँडेड कपडे महागणार आहेत. तंबाखूजन्य पदार्थांवरील अबकारी करात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आल्याने विडीवगळता इतर तंबाखूजन्य पदार्थ महागले आहेत. तसेच सोन्यावरील आयाशुल्कारत वाढ करण्यात आल्याने सोन्याचे दागिने तसेच हि-याचे दागिनेही महागतील. तसेच डिझेल गाडयांवर अडीच टक्के तर पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस लावण्यात आला असून १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्याही महागणार आहेत.
काय काय झाले महाग
- ब्रँडेड कपडे
- लक्झरी कार
- विडी वगळता इतर तंबाखू जन्य पदार्थ तसेच सिगारेट
- सोन व हि-याचे दागिने
- चपला व बूटही महागले