मुंबई : आॅनलाइन कंपन्यांच्या निषेधार्थ देशभरातील ७ कोटी व्यापाºयांनी शुक्रवारी बंद पुकारला आहे. अ. भा. व्यापारी महासंघाने या बंदची हाक दिली आहे.वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार व आॅनलाइन कंपन्यांमुळे पारंपरिक किरकोळ व्यापार संकटात आला आहे. यावर नियंत्रण आणण्यास सरकार धोरण आणत नसल्याचा महासंघाचा आरोप आहे. त्यासाठीच हे आंदोलन होत आहे. देशातील २० हजार व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होतील. सर्व घाऊक बाजारपेठा, किरकोळ बाजारपेठा व किरकोळ दुकानेही बंद असतील. देशभरातील १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प होईल, असा दावा महासंघाने केला आहे. विदर्भातील पेट्रोल पंपही दुपारी बंद राहतील. आॅनलाइन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांच्या संघटनेनेही स्वतंत्रपणे बंदची हाक दिली. त्यामुळे औषध दुकानेसुद्धा बंद असतील.
७ कोटी व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद, आॅनलाइन विक्रीस विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 6:26 AM