नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये शेतकऱ्यांची अनेक महामार्ग जाम केले आहेत, तसेच रेल रोकोही करण्यात येतोय. दरम्यान, आम्ही पुढील दहा वर्षेही आंदोलन करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रियी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
टिकैत पुढे म्हणाले की, केंद्रीय कृषी मंत्री चर्चेसाठी येण्याचे आमंत्रण देत आहे. पण, आम्हाला कृषीमंत्र्यांना विचारायचे आहे की, सरकारने आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगावं. पण, केंद्र सरकार तसं करणार नाहीत. ते फक्त बोलतात पण करत काहीच नाहीत. सरकारने आम्हाला बिनशर्त चर्चेसाठी बोलवावे. 10 वर्षे लागली तरी आम्ही तयार आहोत, पण आम्ही आमच्या मागण्या मागे घेणार नाहीत. तसेच, बंद दरम्यान रुग्णवाहिका, डॉक्टर आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित इतर लोकांना थांबवले जाणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
अनेक ठिकाणी आंदोलनभारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस रोखली आहे. दिल्ली आणि यूपीमधील गाझीपूर सीमादेखील बंद करण्यात आली आहे. गाझियाबाद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीसंदर्भात अॅडवायजरी जारी केली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पंडित राम शर्मा स्टेशनवर प्रवेश बंद केलाय. हरियाणातील बहादूरगडमध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत. यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अक्षय कुमारचा वर्दीतला फोटो पाहून नाराज झाले IPS अधिकारी, अक्षय म्हणाला...
15 कामगार संघटना, 6 राज्य सरकारांचे समर्थन
भारत बंदला 500 हून अधिक शेतकरी संघटना, 15 कामगार संघटना, राजकीय पक्ष, 6 राज्य सरकार आणि इतर अनेक विभाग आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सहाय्यक राज्य सरकारांमध्ये तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेश सरकारांचा समावेश आहे. तर, राजकीय पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पक्ष , समाजवादी पार्टी, तेलुगु देसम पार्टी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, एसएडी-युनायटेड, युवाजन श्रमिक रायठू काँग्रेस पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, स्वराज इंडिया आणि इतर अनेक पक्षांनी भारत बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे.