नवी दिल्ली: आज ७४वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही जाती, धर्माचा असो, तो प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. आज राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. संचलनाबरोबर येथे भारताची सांस्कृतिक विविधता, देशाची सैन्य शक्ती आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहता येणार आहेत. परेडमध्ये काय खास असणार आहे ते जाणून घेऊया.
इजिप्तचे राष्ट्रपती असणार प्रमुख पाहुणे-
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल सिसी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील. अल सिसी यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इजिप्तच्या लष्कराची तुकडीही सहभागी होणार आहे. इजिप्शियन लष्कराच्या १४४ सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणार आहे. इजिप्शियन आर्मीचा १२ सदस्यीय बँडही परेडमध्ये भाग घेणार आहे.
ड्रोनची जादू-
भारतातील पहिल्या पॅसेंजर ड्रोनची जादू ड्युटी मार्गावरही पाहायला मिळणार आहे. या प्रवासी ड्रोनला वरुण असे नाव देण्यात आले आहे. पुण्याच्या सागर डिफेन्स इंजिनीअरिंगने ते तयार केले आहे. काही काळापूर्वी भारतीय नौदलाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वरुणाचे प्रात्यक्षिक केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या पॅसेंजर ड्रोनमध्ये एक व्यक्ती प्रवास करू शकते. हे प्रवासी ड्रोन १३० किलो वजनासह सुमारे २५ किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. एकदा उड्डाण केल्यानंतर वरुण ड्रोन २५-३३ मिनिटे हवेत राहू शकते.
महिला जवानांचं उंटांचं पथक-
यंदा प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर संचलनात नारी शक्तीचा सहभाग लक्षणीय आहे. विविध तुकड्यांचं नेतृत्व तर महिला अधिकारी करणारच आहेत. पण यंदाचं विशेष आकर्षण आहे ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महिला जवानांचं उंटांचं पथक. ‘कॅमल राईडर्स बीएसएफ’ची ही तुकडी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होत आहे. आपल्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर या महिला अधिकारी सीमा सुरक्षा दलाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. बीएसएफच्या वुमन कॅमल कॉन्टिजेन्टला राजस्थान फ्रंटियरच्या ट्रेनिंग सेंटर आणि बिकानेर सेक्टर यांनी प्रशिक्षण दिलं आहे. उंटावर स्वार असणारं हे जगातलं पहिलं महिला पथक आहे. हे महिला उंट पथक नुकतंच अमृतसर इथं झालेल्या बीएसएफ रेजिंग डे परेडमध्येही सहभागी झालं होतं.
हवाई दलाच्या गरुड कमांडोचा समावेश-
यंदा प्रथमच भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होत आहेत. गरुड कमांडो हे भारतीय वायुसेनेचे विशेष प्राणघातक दल आहे. ते जगातील सर्वोत्तम कमांडो दलांपैकी एक आहेत. त्यांचे प्रशिक्षण सर्वात मोठे असते.