नवी दिल्लीः आपलं आधार कार्ड तुम्ही अजून पॅन कार्डशी जोडलं नसेल तर आजच्या आज हे काम करून टाका. अन्यथा, तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाइन भरता येणार नाही आणि तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न अडकू शकेल.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडणं केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंधनकारक केलं आहे. त्यासाठीच मुदत चार वेळा वाढवून देण्यात आलीय. या जोडणीसाठी 31 मार्च 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता. पण नंतर ही मुदत वाढवून 30 जून करण्यात आली होती. त्यामुळे हे काम आजच्या आज करणं गरजेचं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास करदात्याचं पॅन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं.
असं जोडा आधार-पॅन
1. सगळ्यात आधी प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
2. होमपेजवर 'लिंक आधार' लिहिलेली लाल रंगाची एक पट्टी दिसेल.
3. या पेजवर तुम्हाला आधार आणि पॅन कार्डवरील माहिती माहिती भरायची आहे.
4. आधार कार्डवर जन्मतारखेपुढे फक्त जन्मवर्ष असेल तर 'I have only year of birth in Aadhar card' सिलेक्ट करा.
5. captcha code एन्टर केल्यावर आपलं आधार-पॅन जोडल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. captcha code सोबतच तिथे 'Request OTP'चा पर्यायही देण्यात आला आहे.