बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - कथित गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उसळलेल्या दंगलीत सुबोध कुमार सिंह या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हिंदू आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या दंगलीत आपल्या वडलांना गमावणारा अभिषेक म्हणाला की, ''माझे वडील मला धर्माच्या नावावरून समाजात हिंसाचार न माजवणारा चांगला नागरिक घडवू इच्छित होते. मात्र आज माझ्या वडलांनाच हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये आपले प्राण गमवावे लागले. आज दंगलीत माझ्या वडलांनी जीव गमावलाय, उद्या कुणाचे वडील जातील?"
आज दंगलीत माझ्या वडिलांनी जीव गमावलाय, उद्या कुणाचे वडील जातील? शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 9:58 AM
धार्मिक तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे.
ठळक मुद्देकथित गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उसळलेल्या दंगलीत सुबोध कुमार सिंह या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हिंदू आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली.