प्रभागरचनेवर आज पासून हरकती नोंदविता येणार
By admin | Published: October 10, 2016 12:27 AM
पुणे : महापालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग पध्दतीच्या शुक्रवारी जाहीर केलेल्या आराखडयावर दि. १०, सोमवारपासून हरकती नोंदविता येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत या हरकती नोंदविता येणार आहे. महापालिकेच्या मुख्य भवनातील स्वागत कक्ष, सावरकर भवनमधील निवडणूक विभाग व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात हरकती नोंदविता येणार आहेत. त्याचबरोबर या ..... ईमेलवर ही हरकती पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग पध्दतीच्या शुक्रवारी जाहीर केलेल्या आराखडयावर दि. १०, सोमवारपासून हरकती नोंदविता येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत या हरकती नोंदविता येणार आहे. महापालिकेच्या मुख्य भवनातील स्वागत कक्ष, सावरकर भवनमधील निवडणूक विभाग व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात हरकती नोंदविता येणार आहेत. त्याचबरोबर या ..... ईमेलवर ही हरकती पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निित केलेल्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचना निित करून त्या नागरिकांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १० ते २५ ऑक्टोबर दरम्यान हरकती नोंदविण्यात येणार आहेत. या हरकतींवर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून २५ नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.