नवी दिल्ली - आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्तावही राहुल गांधी यांनी दिला आहे. लोकसबा निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पराभवाची जबाबदारी स्वीकारली. '' निवडणूक प्रचारादरम्यान, मी जनता मालक आहे, असे म्हटले होते. आता निकालांमध्ये जनतेने आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन करतो.'' असे राहुल गांधी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक २०१९: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी, दिला राजीनाम्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 6:13 PM