शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कुंभपर्वाच्या पूर्वसंध्येला आज शोभायात्रा

By admin | Published: July 12, 2015 9:40 PM

२५ संस्थांचा सहभाग : साधू-महंतही होणार सहभागी

२५ संस्थांचा सहभाग : साधू-महंतही होणार सहभागी
नाशिक : बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात समजल्या जाणार्‍या पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली असून, राज्यातील विविध संस्थांसह साधू-महंतांच्या सहभागाने सोमवारी (१३) दुपारी ३ वाजता ही शोभायात्रा निघणार आहे. लेझिम पथकासह मर्दानी खेळांचाही या मिरवणुकीत समावेश असेल.
गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहितच्या वतीने आयोजित या शोभायात्रेस काळाराम मंदिर येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. शोभायात्रेत निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर अनी आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय गंगा गोदावरी वतनदार, नाभिक आणि सनई संघटना, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ, माउली प्रतिष्ठान ढोलपथक, सनातन संस्था, महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ, विघ्नहर ढोल पथक, पंत भजनी मंडळ, श्रीराम शक्तिपीठ ब्रšाचारी आश्रम, प्रजापिता ब्रšाकुमारी विश्वविद्यालय, जंगलीदास महाराज भक्तपरिवार, ईस्कॉन परिवार, माहेश्वरी महिला मंडळ, नाशिक सेवा समिती, शिव गोरक्ष सेवा मंडळ, हिंदू एकता आंदोलन पक्ष, श्री दत्त श्रीधर सेवा मंडळ, शनैश्वर सेवा मंडळ, बजरंग दल, बॉश सेवानिवृत्त कामगार संघटना, सिद्ध गणेश महाराज समाधी ट्रस्ट या संस्थांचे चित्ररथही शोभायात्रेत सहभागी असतील. याशिवाय शोभायात्रा मार्गावर राजाभाऊ भुतडा, पिंपळपार चौक, वेलकम सहकार्य मित्रमंडळ यांसह विविध संस्था आणि मित्रमंडळांनी पाणीवाटपाची व्यवस्था केली आहे.
शोभायात्रेचा मार्ग
शोभायात्रा काळाराम मंदिरापासून सुरू होईल. नागचौक, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, आयुर्वेद सेवा संघ, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉईंट, भगवंतराव मिठाई, मंगेश मिठाई, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डपासून रामकुंडापर्यंत ही यात्रा काढण्यात येईल.
धर्मध्वज तयार
नाशिकच्या रामकुंड परिसरात उभारण्यात येणार्‍या या धर्मध्वजाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सिंहस्थाचा एक आणि गोदावरी मंदिराचा एक असे दोन ध्वज तयार करण्यात आले आहेत. सिंहस्थाचा ध्वज आयताकृती असून, त्याची लांबी १५ फूट आणि रुंदी ४.५ फूट आहे. भगव्या रंगाच्या या ध्वजावर सिंहस्थाचा सिंह आणि अमृतकलश यांचे चित्र आहे, तर दुसरा ध्वज गोदावरी मातेचा असून, त्यावर मगरीचे चित्र असेल.
ध्वजस्तंभाचे वजन ५०१ किलो
धर्मध्वज आणि गोदावरी मातेच्या ध्वजासाठी बनवण्यात आलेले स्तंभ ५०१ किलो वजनाचे पितळी धातूचे बनविण्यात आले आहेत. हे स्तंभ गुजरातमधील सोमपुरा येथून हे स्तंभ तयार करण्यात आले आहेत. देशातील महत्त्वाची मंदिरे आणि मूर्ती तयारकरणार्‍या कारागिरांकडून हे स्तंभ तयार करून घेण्यात आले आहेत.
उद्या ध्वजारोहण
कुंभपर्वाची मुख्य सुरुवात असलेले पुरोहित संघाचे ध्वजारोहण उद्या (दि. १४) सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी होणार असून, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, श्रीपाध नाईक, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली.
वायफाय कार्यान्वित
सिंहस्थाअंतर्गत रामकुंड परिसरात बसविण्यात आलेली वायफाय यंत्रणा आज कार्यान्वित करण्यात आली. वस्त्रांतरगृहातील इमारतीत त्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची चाचणी घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
प्रशासनाचे असहकार्य
यंदा प्रथमच केंद्र आणि राज्य शासनाने सिंहस्थासाठी भरघोस निधी दिलेला असतानाही स्थानिक प्रशासन आणि महापालिकेने पुरोहित संघाशी समन्वय न ठेवता कामे केली असून, त्यात समन्वय ठेवला असता तर आणखी चांगली कामे झाली असती, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल म्हणाले. आम्हाला अतिक्रमणच करायचे असते, तर पूर्वजांपासून रामकुंडावर व्यवसाय करणार्‍या अनेक पुरोहितांची प्रत्येकी एक टपरी तरी रामकुंडावर आम्ही उभारली असती, असा टोला त्यांनी अतिक्रमणाचा आरोप करणार्‍या पालिका प्रशासनावर लगावला, परंतु वस्त्रांतरगृहाच्या आणि काढलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावर शुक्लांसह आमदार बाळासाहेब सानप यांनीही बोलणे टाळले.