शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

आजच्या ‘भारत बंद’मधून रेल्वे, अत्यावश्यक सेवा वगळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 6:28 AM

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातील चार कोटी कामगार सहभागी होणार आहेत. मात्र रेल्वे व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती कामगार कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली. या संपात राज्य सरकारी कर्मचारीही सहभागी होणार आहेत.या संपात केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक बँका, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, पालिका, महापालिका कर्मचारी तसेच टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी, बांधकाम कामगार सहभागी होणार आहेत. सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती या शिक्षकांच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.शाळा, महाविद्यालयांनी या संपात सहभाग घेतलेला नाही. मात्र विविध कामगार संघटनांचे शाळा, महाविद्यालयांतील प्रतिनिधी काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार आहेत. छात्रभारतीसारख्या संघटनांनी कामगार संघटनांच्या या संपाला पाठिंबा म्हणून विद्यापीठ बंदची हाकही दिली आहे. स्कूल बससेवा चालू ठेवायच्या की नाही याचा निर्णय त्याच दिवशी घेऊ, असे स्कूल बस असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.या बंदला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी माकप, भाकप, शेकाप आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. भारत बंदची हाक देताना अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. nसार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रीकरण व जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर बंदी, पेट्रोल डिझेल कर कमी करावेत, कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करावी, २४ लाख रिक्त पदे भरण्यात यावीत, कामगारविरोधी व मालकधार्जिणे कायदे रद्द करावेत, किमान वेतन २१ हजार रुपये असावे, असंघटित कामगार, शेतकरी, कष्टकरी सर्वांना किमान पेन्शन १० हजार करण्यात यावे, या बंदच्या आयोजक संघटनांच्या मागण्या आहेत.याशिवाय रोजगार हमी कायदा प्रभावी करण्यात यावा, मनरेगावर कामगारांना अधिक दिवस व वाढीव दर मिळावा, ग्रामीण भागांत अधिक गुंतवणूक करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात, विविध योजनांवर तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या कामगारांना कायम करावे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा असावा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, महागाई भत्त्याचे थकित हप्ते द्यावेत, समान कामासाठी समान वेतन व अन्य फायदे हे धोरण अंमलात आणावे, याही मागण्या करण्यात आल्या आहेत.>मुंबई, ठाणे, रायगड हा औद्योगिक पट्टा आहे. यामध्ये संघटित, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, रोजंदार सर्व जण बंदमध्ये सहभागी होणार असून, एकूण ५० लाख जण सहभागी होणार आहेत. तसेच या भागात २० विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहेत.>रिक्षा व टॅक्सीबाबत संदिग्धतारिक्षा व टॅक्सी संघटना सहभागी होणार का, याबाबत संदिग्धता आहे. उद्याची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे टॅक्सीमेन्स युनियन्सचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. एकही रिक्षा बंद राहणार नाही असे स्वाभिमान रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते के. के. तिवारी म्हणाले.

टॅग्स :jnu attackजेएनयू