नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.16 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 7 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 65.12 रुपयांवर आला आहे.
दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 68.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 7 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 62.24 रुपयांवर आला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)