नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल महागले आहे. पेट्रोल दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 16 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 79.71 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69 रुपये आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 16 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 74.05 रुपये आणि 65.79 रुपये मोजावे लागतील.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत पेट्रोल 11 पैशांना महागलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.55 रुपये मोजावे लागले. मात्र डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69 रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर वाढले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 12 पैशांनी महागलं होतं. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 73.89 रुपये मोजावे लागतील तर डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 65.79 रुपयांवर आला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आदेशाने तेल कंपन्यांनी सुरू केलेली कार्डावरील इंधन खरेदीवरील कॅशबॅक सवलत बंद केली आहे. नोटाबंदीनंतर 2017 च्या सुरुवातीस ही सवलत सुरू करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ‘एसबीआय कार्ड्स’ने आपल्या ग्राहकांना असा निर्णय घेतल्याबाबतचा एक संदेश पाठविला होता. त्यामध्ये कार्ड पेमेंट करून भरण्यात येणाऱ्या इंधनावर देण्यात येत असलेली 0.75 टक्के कॅशबॅकची सवलत 1 ऑक्टोबर 2019 पासून काढून घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बँकांना कळविले होते. इतर कार्ड पुरवठादार कंपन्याही यासंबंधीची घोषणा लवकरच करतील, असे सांगण्यात आले होते. ही सवलत तेल वितरक कंपन्यांकडून दिली जात होती. परंतु ग्राहकांना मिळणाऱ्या कॅशबॅकचे क्रियान्वयन मात्र कार्ड पुरवठादार कंपन्या करीत होत्या.