ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - आपल्या सर्वांच्या रोजच्या दैनंदिन वापरात येणा-या गूगलचा आज वाढदिवस आहे. गूगलचा आज अठरावा वाढदिवस असून यानिमित्ताने खास गूगल डूडलही तयार करण्यात आलं आहे. 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना करण्यात आली होती. खरंतर गूगलचा वाढदिवस नेमका कधी यावरुन वाद झाला होता. मात्र गतवर्षी 27 सप्टेंबरलाच वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
सर्वांच्याच गळ्यातलं ताईत बनलेल्या गूगलचं नामकरण चुकीमुळे झालं होतं. सर्वांनाच माहित आहे की गुगलचं स्पेलिंग 'Google' असं आहे पण खरं तर ते 'Googol’ असं ठेवायचं होतं. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे हे नाव पडलं आणि पुढे तेच प्रसिद्ध झालं. पेज आणि ब्रेन यांनी सुरुवातीला गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं, मात्र त्यानंतर गूगल असं नाव करण्यात आले.