आयपीएलच्या सहाव्या पर्वात झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीच्या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास सचिन तेंडुलकरने नकार दिला. हे प्रकरण सध्या न्यायालयाच्या अधीन असून त्यावर आत्ता काहीही बोलणे उचित ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयच या अहवालावर निर्णय घेईल असेही त्याने म्हटले.
राजस्थानमधील ज्योतिषी नथ्थूलाल यांच्याशी स्वत:च्या भविष्यासंदर्भात तब्बल चार तास चर्चा केल्याने मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकल्या आहेत. अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असलेल्या इराणींनी ज्योतिषाकडे जाऊन अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याची टीका विरोधकांनी सुरु केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे २४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील निवासस्थानी कर्करोगाने निधन झाले. गांधी परीवाराशी अत्यंत जवळिक असलेल्या व त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या मुरली देवरा यांचा मुंबई काँग्रेसवर दबदबा राहिला.
बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई असलेल्या गुरुनाथ मेयप्पन यांच्यावर आयपीएलमध्ये बेटिंग केल्याचा आरोप असून मेयप्पन चेन्नई सुपरकिंग्जच्या व्यवस्थापनातही सहभागी होते असे मुदगल समितीने म्हटले आहे.
आयपीएलमधल्या बेटिंग व स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे क्रिकेटची प्रचंड बदनामी झाली असून सभ्य गृहस्थांचा खेळ असलेल्या क्रिकेटमधून आयपीएल हद्दपार करावं अशी मागणी क्रिकेटप्रेमींकडून होत आहे.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनेच खेळला गेला पाहिजे पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयची कानउघडणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश करणारे विजयकुमार गावित हे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आले आहेत. पोलिस उपअधीक्षक आणि दोन अधिका-यांनी याप्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करावा असे आदेश हायकोर्टाने दिले असून याप्रकरणाची पुढील सुनावणी २ डिसेंबरला होणार आहे.
राज्यातील बॅनरबाजीवर लगाम लावण्यासाठी सोमवारी हायकोर्टाने कठोर निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने अनधिकृत बॅनर्सवर नजर ठेवण्यासाठी २३ वकिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून बॅनर लावणा-या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करा असे निर्देशही हायकोर्टाने स्थानिक यंत्रणांना दिले आहे.