मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गुरुवारी ठाण्यात संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन करण्यात आले.
काळा पैशावरुन केंद्र सरकारविरोधात तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. काळ्या छत्रीनंतर गुरुवारी तृणमूलचे खासदार काळी शाल घालून संसदेत आले होते. काळा पैसा परत आणा अशी घोषणाबाजीही या खासदारांनी केली.
जम्मू काश्मीरमधील अरनिया सेक्टर येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादीही ठार झाले.
आयपीएल फिक्सिंगप्रकरणात सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना गुरुवारी जोरदार दणका दिला. चेन्नई सुपर किंग्जला अपात्र ठरवायला हवे असे मत कोर्टाने मांडले आहे.
उसळता चेंडू लागल्याने कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे गुरुवारी निधन झाले. मंगळवारी सिडनीत शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेदरम्यान शॉन अॅबॉट या गोलदाजाने टाकलेला बाऊन्सर चेंडू ह्यूजच्या डोक्याला लागला होता.
सार्क परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे पुन्हा एकदा समोरसमोर आले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केले पण दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.