ऑनलाइन लोकमत -
आंध्रप्रदेश, दि. १० - इस्त्रो आज सहाव्या जलवाहतूक उपग्रह आईआरएनएसएस-1 एफचे (Regional Navigation Satellite System-1F) प्रक्षेपण करणार आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता हे प्रक्षेपण केले जाणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून हे प्रक्षेपण पार पाडणार आहे. प्रक्षेपणासाठीचा 54 तासांचा काऊंटडाऊन मंगळवारीच सुरु करण्यात आला होता. पीएसएलव्ही सी-32च्या (Polar Satellite Launch Vehicle) सहाय्याने या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. पीएसएलव्ही सी-32चे हे आत्तापर्यंतचं 34व मोठं मिशन आहे.