कातळेवाडी दारूबंदीसाठी आज मतदान
By admin | Published: September 12, 2014 10:38 PM
मलकापूर : कातळेवाडी (ता. शाहूवाडी) या गावात दारूबंदीसाठी उद्या, शनिवारी मतदान होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार बाजीराव पाटील यांनी दिली.
नाशिक : विद्यमान पदाधिकार्यांच्या कार्यकाळात सेस निधी नियोजनावरून संघर्ष उद्भवला असतानाच आता २१ सप्टेंबरनंतर विराजमान होणार्या नवीन पदाधिकार्यांच्या नशिबी हे कोट्यवधी रुपयांचे नियोजन करण्याचे अधिकार येण्याची चिन्हे आहेत.विद्यमान उपाध्यक्ष संपतराव सकाळे व सभापती राजेश नवाळे, अलका जाधव, सुनीता अहेर, ज्योती माळी यांच्यासह २६ सदस्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन २१ मेच्या सभेतील दोन ठराव व २० ऑगस्टच्या सभेतील २ ठराव असे एकूण चार ठरावांबाबत कायदेशीर आक्षेप उपस्थित केले होते. तसेच निधी वाटपात विरोधी पक्षनेता केदा अहेर यांच्या गटात १ कोटी ५ लाख, तर प्रवीण जाधव यांच्या गटात ४५ लाखांचा निधी, तसेच एकाच सत्ताधारी सदस्याच्या गटात १ कोटी ४१ लाखांचा निधी वितरित करून अन्य सदस्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला होता. हे कामे रद्द करण्यासाठी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह चारही सभापतींनी स्वाक्षरी मोहीम राबवून विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. या पत्रानुसारच आता विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र देऊन हे चारही ठराव रद्द करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे. त्यामुळेच सेस निधीच्या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्याने निधीचे फेरनियोजन होण्याची शक्यता बळावत चालली आहे. त्यामुळेच २१ सप्टेंबरनंतर पदभार स्वीकारणार्या पदाधिकार्यांना निधी नियोजन करताना ते अत्यंत काळजीपूर्वक करावे लागणार असल्याची चर्चा जिल्हा परिषद सदस्यांमध्ये आहे.(प्रतिनिधी)