पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होत असून सहा नक्षलग्रस्त जिल्'ातील ३२ मतदारसंघांमध्ये ४५६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद होणार आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी गया जिल्'ात दोन ठिकाणी पेरून ठेवलेले बॉम्ब पोलिसांनी गुरुवारी सकाळी जप्त केले.चौगाई गावाजवळ एका पुलाखाली पाच किलो वजनाचा एक सिलिंडर बॉम्ब पेरण्यात आला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या सूचनेच्या आधारे वेळीच पोलिसांनी तो ताब्यात घेऊन निष्क्रिय केला. दुसऱ्या घटनेत डुमरिया पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या केवला कला माध्यमिक विद्यालयाच्या एका वर्गातून पोलिसांनी आयईडी जप्त केला.गयासह कैमूर, रोहतास, अरवल, जहानाबाद आणि औरंगाबाद या नक्षलग्रस्त जिल्'ात होणाऱ्या मतदानाकरिता कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी ९,११९ मतदान केंद्रांमधून एकूण ८६,१३,८७० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी दिली.
आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान
By admin | Published: October 16, 2015 4:09 AM