नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. अरुणाचल आणि उत्तराखंडमध्ये झालेले सत्तांतर, समान नागरी कायद्याचा घातलेला घाट, भडकलेले कश्मीर यावरून हे अधिवेशन वादळी तर ठरणार आहेच. पण, जीएसटीच्या निमित्ताने सरकारची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. दरम्यान, जीएसटी मंजूर करण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कश्मीर आणि अरुणाचलच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार असल्याचे स्पष्ट संकेत विरोधकांनी दिले आहेत. तथापि, अन्य बाबींपेक्षा राष्ट्रीय हिताला महत्व देण्यात यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केले आहे. आपण पक्ष आणि नागरिक या दोघांचेही प्रतिनिधित्व करत आहोत, त्यामुळे राष्ट्रीय हितही पहावे असे ते म्हणाले.
आजपासून ‘वादळी’ अधिवेशन
By admin | Published: July 18, 2016 5:58 AM