शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

तोगडियांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:59 AM

विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडलेले व वादग्रस्त वक्तव्यांनी आग्यामोहोळ उठविणारे नेते प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या संघटनेची रविवारी स्थापना केली.

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडलेले व वादग्रस्त वक्तव्यांनी आग्यामोहोळ उठविणारे नेते प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या संघटनेची रविवारी स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही नेत्यांवर असलेला राग तोगडिया यांनी कधीही लपवून ठेवला नव्हता. आपला सातत्याने अपमान केला जातो, अशी त्यांची भावना झाली होती.आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही विश्व हिंदू परिषदेची स्पर्धक संघटना असणार याचेच संकेत तिच्या नवी दिल्लीत झालेल्या स्थापना कार्यक्रमातून मिळाले आहेत. या कार्यक्रमात प्रवीण तोगडिया यांनी परिधान केलेल्या टोपीवर ‘हिंदू ही आगे' असे लिहिलेले होते. या वेळी व्यासपीठावर भारतमाता, गोमाता व गणपती, तसेच अशोक सिंघल यांच्या तसबिरी ठेवलेल्या होत्या. त्यातून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची भविष्यातील वाटचाल कोणत्या मार्गाने होणार हे उपस्थितांना स्पष्टपणे जाणवत होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणाले की, नव्या लोकांना घेऊन मी माझे काम सुरु केले आहे.