लखनऊ, दि. 6 - घरात टॉयलेट नसल्यामुळे बहिणीला शौचासाठी उघड्यावर जावं लागते. त्यामुळे तिला त्रास होत असल्यामुळे एका मुलानं आपल्या बहिणीला टॉयलेट गिफ्ट दिलं आहे.देशभरात उद्या रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपल्या बहिणीला अनोखं गिफ्ट देण्याचा सर्वच भावांचा प्रयत्न असतो. यूपीमधील एका मुलानं आपल्या बहिणीला चक्क टॉयलेट गिफ्ट दिलं आहे. उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील रुद्रगढ नौसी गावातील एका मुलानं आपल्या बहिणीला चक्क टॉयलेट गिफ्ट दिलं आहे. आपल्या घरी शौचालय नसल्यामुळे बहिणीला त्रास सहन करावा लागतो, आपण ते पाहू शकत नाही, त्यामुळे आपण बहिणीला हे गिफ्ट दिल्याचं मुलानं सांगितलं. ह्यराखी शौचालयह्ण असं या टॉयलेटला नाव देण्यात आलं असून त्याला फुग्यांनी सजवण्यातही आलं आहे.बहिणीला टॉयलेट गिफ्ट देण्याची निर्णय घेतल्यानंतर मोठ्या कष्टानं आपण 15 हजारांची जमवाजमव केली. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही खूप मोठी रक्कम आहे, असंही तो म्हणाला. दरम्यान यूपीमध्ये अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी शौचालय बांधली आहेत. उद्या रक्षाबंधनादिवशी ही शौचालयं बहिणींना भेट दिली जाणार आहेत.तरुणाच्या निर्णयाची दखल जिल्हाधिकाऱ्यानंही घेतली. त्याला जिल्ह्याचा ब्रँड अंबेसजर बनवण्यात आले आहे. इतर तरुणांनी त्याच्यापासून बोध घ्यावा असा त्यामागिल उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
रक्षाबंधनासाठी बहिणीला 'टॉयलेट' गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 6:44 PM