Neeraj Chopra Gold Medal in Tokyo Olymic: यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. यावर्षी भारतानं सात पदकं आपल्या नावे केली. यामध्ये एक सुवर्ण पदक, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वच खेळाडूंची कामगिरी ऑलिम्पिकदरम्यान उत्तम होती. दरम्यान, नीरज चोप्रानं अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.
नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावर केला. परंतु गुजरातमधील भरूच येथील एका पेट्रोल पंप चालकानं मात्र लोकांना अनोखी भेट दिली. त्यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला. भरूचमध्ये असलेल्या पेट्रोल पंपाचे चालक अयूब पठाण हे नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना ५०१ रूपयांचं पेट्रोल मोफत (Free Petrol) देत आहेत.