श्रीनगर : हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या बुऱ्हान वणी मारला गेल्यानंतर गेले चार महिने निर्माण झालेल्या अशांततेमुळे विद्यार्थी शाळेत जाऊ न शकल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील इयत्ता ५ वी ते ९ वी आणि इयत्ता ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता वरच्या वर्गांत पाठविण्याचा निर्णय जम्मू-कामीर सरकारने गुरुवारी जाहीर केला. हा निर्णय राज्यातील सर्व सरकारी आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना लागू होईल. त्यानुसार या विद्यार्थ्यांची या वर्षाची दुसरी सत्रांत परीक्षा घेण्यात येणार नाही व नवे शैक्षणिक वषर्ही लगेच सुरू होईल. या आधी सरकारने इयत्ता ५ वी ते ९वी या इयत्तांमध्ये नापास करून कोणालाही त्याच वर्गात न ठेवण्याचा निर्णय रद्द केला होता. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल. राज्यात इयत्ता १० व १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षा गेल्याच आठवड्यांत झाल्या. (वृत्तसंस्था)
काश्मीरचे सर्व विद्यार्थी सरसकट वरच्या वर्गात
By admin | Published: November 18, 2016 1:17 AM