शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

सर्वच क्षेत्रांचा टॉप गीअर; जीएसटी संकलनात मोठी वाढ, शेअर बाजाराचीही भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 6:18 AM

सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात केली.

नवी दिल्ली : दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीचा हंगाम सरकारसह एकूणच सर्वच क्षेत्रांसाठी लाभदायक ठरला. केंद्र सरकारने सलग आठव्या महिन्यात १.४० लाख काेटींहून अधिक जीएसटी संकलन केले. साेन्याची मागणी १४ टक्क्यांनी वाढली. वाहन विक्रीनेही टाॅप गीअर घेतला. पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रीतही वाढ झाली. 

सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात केली. यावर कळस चढवला ताे शेअर बाजाराने.  सेन्सेक्सनेही तब्बल ९ महिन्यांनी पुन्हा ६१ हजारांची पातळी गाठली. असा हा पंचानन राजयाेग जुळून आला ताे नाेव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी. 

सिलिंडरची दरकपात

सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ११५.५० रुपयांनी कमी केल्याने मुंबईत १९ किलाेचा सिलिंडर आता १,८११ रुपयांना मिळेल. 

जीएसटी संकलन १.५२ लाख कोटी

ऑक्टाेबर महिन्यात तब्बल १.५२ लाख काेटी रुपये एवढे जीएसटी संकलन झाले. आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे जीएसटी संकलन ठरले आहे. या संकलनामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे.  विशेष म्हणजे, सलग आठ महिन्यांपासून जीएसटी संकलन १.४० लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त राहिले आहे.

साेन्याची मागणी १४% वाढली : 

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत साेन्याची मागणी १४ टक्क्यांनी वाढून तब्बल १९१.७ टनांवर पाेहाेचली. ही मागणी काेराेनापूर्व काळापेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १६८ टन एवढी मागणी हाेती. तर २०१९ मध्ये याच कालावधीत साेन्याची मागणी १२३ टन एवढी हाेती.

वाहनविक्रीत ३०% वाढ 

ऑक्टाेबर महिन्यातील प्रवासी वाहनविक्रीचे आकडे जाहीर करण्यात येत आहेत. जवळपास सर्वच कंपन्यांनी दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर जाेरदार विक्री केलेली आहे. प्रवासी वाहनविक्रीत सरासरी ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे, तर दुचाकीची विक्रीही वाढलेली आहे.

इंधन आणि विजेचीही मागणी वाढली

या काळात लाेकांनी भरपूर प्रवास केला, मागणी-पुरवठ्याच्या साखळीमुळे मालवाहतूकही वाढल्याने ऑक्टाेबरमध्ये देशातील पेट्राेल आणि डिझेलची मागणी १२ टक्क्यांनी वाढली. याशिवाय ऑक्टाेबरमध्ये विजेचीही मागणी वाढून ११४.६४ अब्ज युनिट एवढी झाली.

रेल्वेचीही कमाई!

रेल्वेचीही कमाई या आर्थिक वर्षात १७ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते ऑक्टाेबर या काळात रेल्वेने मालवाहतुकीतून ९२ हजार ३४५ काेटी रुपयांची कमाई केली. गेल्या वर्षी हा आकडा ७८ हजार ९२१ एवढा हाेता. 

सेन्सेक्सचा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७५ अंकांच्या उसळीसह ६१,१२१ अंकांवर बंद झाला. तब्बल ९ महिन्यांनी हा टप्पा गाठला असून, यापूर्वी १७ जानेवारीला सेन्सेक्स या पातळीवर बंद झाला हाेता. निफ्टीही १३३ वधारून १८,१४५ अंकांवर बंद झाला. 

टॅग्स :GSTजीएसटीIndiaभारतshare marketशेअर बाजार