बालकावर अत्याचार
By admin | Published: February 18, 2015 11:53 PM
बालकावर अत्याचार
बालकावर अत्याचार आरोपीला तीन वर्षे कैदनागपूर : सहा वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कुणाल ऊर्फ पप्पू रमेश चौधरी (२८) रा. रिपब्लिकननगर जरीपटका, असे आरोपीचे नाव आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगा हा २ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी पप्पूच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेला होता. घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. प्राप्त तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३७७, ५११ आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ७, ८ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास निवृत्त उपनिरीक्षक जाधव आणि विद्यमान उपनिरीक्षक जे.व्ही. अहीरराव यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय लांबट यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड. सोनी यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक हनवते, सहायक उपनिरीक्षक रामानुज पांडे, हेड कॉन्स्टेबल गंगाधर पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.