शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

अश्लील संभाषणप्रकरणी प्राध्यापकासह तिघांना कोठडी करमाळा येथील आत्महत्या प्रकरण : तंटामुक्त ामिती अध्यक्ष व रा.कॉ. अध्यक्षाचा समावेश

By admin | Published: September 03, 2015 11:52 PM

सोलापूर : करमाळा येथील विद्यार्थिनीबरोबर सलगी करणार्‍या प्राध्यापकाने भ्रमणध्वनीवरील क्लिप सोशल मीडियावरून प्रसारित केल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक वामन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन रामचंद्र घोलप व केडगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे या तिघांना सह जिल्हा न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोलापूर : करमाळा येथील विद्यार्थिनीबरोबर सलगी करणार्‍या प्राध्यापकाने भ्रमणध्वनीवरील क्लिप सोशल मीडियावरून प्रसारित केल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक वामन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन रामचंद्र घोलप व केडगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे या तिघांना सह जिल्हा न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
एका महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील बारावीतील विद्यार्थिनीबरोबर प्रा. वामन शिंदे नावाच्या शिक्षकाने भ्रमणध्वनीवरून ईल संभाषण करून त्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियात प्रसारित केली होती. ही बदनामी सहन न झाल्याने त्या पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी प्रा. वामन शिंदे यांना अटक करून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कट रचणे, फिर्यादीवर दबाव आणणे, फिर्यादीला पोलिसांपर्यंत पोहोचू न देणे, शिवाय ब्लॅकमेलिंग करणे या आरोपावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घोलप व केडगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोराडे यांना पोलिसांनी अटक केली होती.
न्यायालयांनी तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत गुरूवारी संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपींतर्फे अँड. धनंजय माने, अँड. भारत क?े, अँड. जयदीप माने, अँड. कमलाकर वीर तर सरकारतर्फे अँड. रामदास वागज यांनी काम पाहिले. अधिक तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तिरुपती काकडे करीत आहेत. (प्रतिनिधी)