शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
2
"मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
3
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
4
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
5
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
6
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
8
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
9
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
10
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
11
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
12
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
14
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
15
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
16
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
17
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
18
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
19
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
20
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 8:49 AM

भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा...

नवी दिल्ली -  केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 2003 साली वाजपेयी सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावानंतर प्रथमच कुठल्याही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला जाणार आहे. भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिकवेळा इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहे. जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद सांभाळणाऱ्या इंदिरा गांधी यांना स्वपक्षीय आणि विरोधकांकडून अनेकवेळा विरोधाचा सामना करावा लागला होता. दीर्घकाळ देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात सर्वाधिक 15 वेळा अविश्वास प्रस्ताव मांडला गेला. त्यापैकी 1966 ते 1975 या काळात इंदिरा गांधींना 12 वेळा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले. तर 1981 आणि 1982 मध्ये तीन वेळा त्यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. भारतात सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला गेला होता. 1963 साली आचार्य जे.बी. कृपलानी यांनी नेहरूंच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. मात्र हा प्रस्ताव तब्बल 347 मतांनी फेटाळला गेला होता. त्यानंतर एकूण 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडले गेले आहेत. त्यापैकी तीन वेळा अविश्वास प्रस्ताव पारित होऊन सरकार पडले. तर तीन वेळा अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पंतप्रधानांनी राजीनामे दिले. दरम्यान, मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने उरलेले विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील, पण ठराव संमत होण्याची शक्यता अजिबातच नाही. आपला ठराव संमत होणार नाही, हे विरोधकांनाही माहीत आहे आणि ते तसे मान्यही करीत आहेत. पण यानिमित्ताने सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. त्यामुळे सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार