नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचे ५६,२८२ नवे रुग्ण गुरुवारी आढळले असून, त्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या आता १९ लाख ६४ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९०४ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या ४०,६९९ झाली आहे.कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता १९,६४,५३६ झाली असून, येत्या एक-दिवसात हा आकडा २० लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात ५,९५,५०१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३,२८,३३६ झाली आहे.
कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ६७.१९ टक्के असून, बुधवारी ५१,७०६ जण या आजारातून बरे झाले. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा २.०९ टक्के आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांचे हे फळ असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोनाच्या ६,६४, ९४९ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात पार पडलेल्या आतापर्यंतच्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २.२१ कोटी झाली आहे. दर दहा लाख लोकांमागील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढून ते आता १५,५६८ झाले आहे.च्कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण १४ दिवसांपूर्वी ६३ टक्के होते. त्यात आता वाढ झाली आहे.च्कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ४,४६१, दिल्लीमध्ये ४,०४४, गुजरातमध्ये २,५५६, कर्नाटकमध्ये २,८०४, आंध्र प्रदेशमध्ये १,६८१ इतकी आहे.च्झायडस कॅडिला ही कंपनी बनवीत झायकोव्ह-डी या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांच्या दुसºया टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली.च्झायकोव्ह-डी ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे मानवी चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात आढळल्याचे या कंपनीने म्हटले आहे.च्या लसीच्या मानवी चाचण्या करण्यास केंद्र सरकारने झायडस कॅडिला कंपनीला २ जुलै रोजी परवानगी दिली होती.