नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७७ वर पोहोचली आहे. देशात १७ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रातील ९ आणि दिल्ली, लडाख व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे. तर एक विदेशी नागरिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
मंत्रालयाने सांगितले की, दिल्लीत सहा रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशात गुरुवारपर्यंत १० रुग्ण समोर आले आहेत. कर्नाटकात ५, महाराष्ट्रात ११ आणि लडाखमधील रुग्णांची संख्या ३ झाली आहे. राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मिर व पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. केरळात आतापर्यंत १७ रुग्ण समोर आले आहेत.
यातील तीन रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज दिला आहे. ग्रीसहून कर्नाटकात बंगळुरुत आलेल्या २६ वर्षाच्या एका तरुणाला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयाने सांगितले की, एकूण ७३ रुग्णांपैकी १६ जण इटलीचे नागरिक आहेत. तर, अन्य एक विदेशी नागरिक आहे.भीतीला नाही, सावधगिरीला हो म्हणा -मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबत देशातील नागरिकांना आवाहन करताना टष्ट्वीट केले आहे की, सरकार पूर्णपणे सतर्क आहे. लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये. भीतीला नाही म्हणा. सावधगिरीला हो म्हणा.आगामी काळात कोणीही केंद्रीय मंत्री विदेशात प्रवास करणार नाही. देशातील नागरिकांनीही गरज नसताना असा प्रवास करु नये, असे आवाहन मी करतो.
सर्व मंत्रालयांनी आणि राज्यांनी सुरक्षेसाठी अनेक पावले उचलली आहेत. यात व्हिसा रद्द करण्यापासून ते आरोग्य सुविधा वाढविण्यापर्यंत अनेक उपाययोजनांचा समावेश आहे.उत्तर प्रदेशात महिलेला संसर्गउत्तर प्रदेशातील लखनौमध्ये भारतीय वंशाच्या एका महिला डॉक्टरला संसर्ग झाला आहे. त्यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही महिला कुटुंबासह कॅनडात राहते. अलीकडेच त्या पतीसह भारतात आल्या होत्या.