ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात इसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादीच्या जेवणातून विषप्रयोग करण्यात आला आहे. यानंतर अबू अल बगदादीची प्रकृती चिंताजनक आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बगदादीसोबत इस्लामिक स्टेटच्या आणखी तीन दहशतवाद्यांवर जेवणातून विषप्रयोग करण्यात आला.डेली मेलच्या वृत्तानुसार बगदादीसह विषप्रयोग झालेल्या आणखी 4 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी अज्ञात स्थळी हलवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इसिसनं जेवणात विषप्रयोग करणा-यांना पकडण्यासाठी एक अभियानही राबवलं आहे. मात्र अन्य तीन दहशतवाद्यांबाबत अद्यापही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.बगदादीला अल कायदा या दहशतवादी संघटनेला तोडून इसिसच्या माध्यमातून नवी दहशतवादी संघटना बनवण्यासाठी जबाबदार धरलं जातं. इसिसही जगातली सर्वात कुख्यात आणि श्रीमंत दहशतवादी संघटना आहे.
इसिसचा म्होरक्या अबू अल बगदादीवर जेवणातून विषप्रयोग
By admin | Published: October 04, 2016 12:26 AM