शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

केवळ रुपयामध्ये किलोभर फळं-भाजी देणार हा व्यापारी

By admin | Published: February 21, 2017 3:29 PM

28 फेब्रुवारी रोजी स्वस्त फळं-भाजीपाला खरेदीची अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी 1 रुपयात किलोभर ताजी फळं आणि भाजीपाला ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

 ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 21 - खानपूर येथील रायफल क्लब ग्राऊंडमध्ये 28 फेब्रुवारी रोजी अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी 1 रुपयात किलोभर ताजी फळं आणि भाजीपाला ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.  हेल्पिंग हँड ही स्वयंसेवी संस्था आणि भाजीपाला विक्रेता परेश पटेल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 
 
जमालपूरमधील एपीएमसी मार्केटमध्ये पटेल यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. या मोहीमेबाबत त्यांनी सांगितले की, महागाईमुळे भाजीपाला आणि फळांची खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर, गरिबांसाठी आगामी काळात हा कार्यक्रम शहरातील अन्य भागांमध्येही राबवणार असून या योजनेला आम्ही नियमित स्वरुप देऊ इच्छितो. 
 
हेल्पिंग हँडचे सदस्य साजिद सईद यांनी सांगितले की, गरिबांसाठी हिरवा भाजीपाला आणि फळांची कमी किंमतीत विक्री करण्यासाठी 12 ट्रक फळ-भाजीपाल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. प्रत्येकाला वितरणावेळी याचे एक पाकिट मिळेल. 
पटेल यांनी असेही सांगितले की, 'फळ-भाजीपाल्याच्या या पाकिटात कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, सफरचंद आणि केळे यांचा समावेश असेल.
(मुलीला गुजराती शिकवण्यासाठी सोडली अमेरिकेतील लठ्ठ पगाराची नोकरी)
 
फळ- भाजीपाल्याची खरेदी थेट शेतक-यांकडून केली जाईल. यामुळे शेतक-यांनाही त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळेल. दलालांसाठी होणा-या खर्चात कपात होईल. या उपक्रमाद्वारे होणा-या आर्थिक फायद्यातून निगम हॉस्पिटलला व्हेंटिलेटर देण्याचीही योजना आहे'. दरम्यान, पटेल यांच्या स्वस्त भाजीपाला विक्री उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.