नाशिक : श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात रविवारी (दि. ७) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हार्याजवळ नागनर्सोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ नागदेवतेची रांगोळी काढून नामपंचमीची विधीवत पूजा करण्यात आली.नागदेवतेची मनोभावे पूजा करताना भिंतींवर तसेच पाटावर नागाची चित्र काढण्यात आली होती. देवापुढे रांगोळीतून नाग-नागीण आणि नागकुळं काढण्यात आली. नागपंचमीला अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, तक्षक, कालिया, शंखपाल, पद्मक, कर्कोटक या नऊ नागांच्या पुजनाला विशेष महत्त्व असल्याने पूजा करताना भाविकांकडून प्रार्थनेतून या नवनागांचा उल्लेख करण्यात आला. यावेळी लाा, दूध, खीर आणि उकडीच्या पाणोळ्यांचा नैवेद्य दाखविण्यात येऊन कहाणीचे वाचन करण्यात आले.घरोघरी नागपंचमीनिमित्त गव्हाची खीर, पुरणाचे दिंडं, उकडीचे पाणोळे अशा पदार्थांचे सेवन करण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये, केस विंचरू नये, अशी अख्यायिका असल्याने याबाबतचे नियम भाविकांकडून पाळण्यात आले. शहरातील कॉलेज रोड तसेच मॉल्समध्ये जाऊन महिलांनी आपल्या हातावर मेंदी काढत श्रावण महिन्यातील पहिल्याच सणाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील अनेक भागांत वारुळांचे पूजनही महिलांकडून करण्यात आले तसेच शहरापासून जवळ असलेल्या उपनगरांमध्ये झोके खेळून तसेच वारूळ पूजन करण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नागदेवतेच्या पूजनासाठी मखमलाबाद येथील नागमंदिर, पंचवटीतील नाग चौक येथील मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शेतकर्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणार्या नागदेवतेची शेतकर्यांनीही मनोभावे पूजा केली. आपल्या धान्याचे उंदीर, घुशीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांकडून नागदेवतेचे पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)चौकट :नाशिकरोडच्या बातमीची चौकट वापरणेफोटो : तांबे देणार आहेत.
पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा
By admin | Published: August 07, 2016 9:53 PM