पित रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
By admin | Published: July 12, 2016 12:09 AM
पित रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.
पित रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. रद्द गाड्या५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर, ५९०७५ सुरत-भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर.सुरत-जळगाव रेल्वे मार्गावरील वळविलेल्या गाड्या- भोपाळ-रतलाम-गोध्रा-वडोदरा-अहमदाबाद मार्गे वळविलेल्या..१२८३४ हावडा-अहमदाबाद, १२६५६, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२९०६ , हावडा-पोरबंदर, १२८३३ अहमदाबाद-हावडा, १२९३७ राजकोट-रेवा. - सुरत-वसई रोड-कल्याण-नाशिक-जळगाव मार्गे वळविलेल्या गाड्या...११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी, १८५०२ गांधीधाम-विशाखापनम, १९०४५ सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस, १२६५५ अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस, १७०३८ बिकानेर-सिकंदराबाद, १९०५८ वाराणसी-उधना. रविवारी संध्याकाळी जळगाव कडून गेलेली सुरत पॅसेंजर नंदुरबार येथूनच सोमवारी सकाळी परत आली. प्रवाशांचे हाल....जळगाव येथून नंदुरबार, सुरतकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रविवारी रात्री अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सोमवारी सकाळीदेखील अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर गेले, मात्र तेथे गेल्यावर रेल्वे गाड्या रद्द असल्याची माहिती मिळाल्याने अनेक जण माघारी परतले. बसेस्ची सोय...रविवारी रात्री रेल्वे रद्द झाल्याने जळगाव आगारातून जादा बस सोडण्यात येऊन प्रवाशांना रवाना करण्यात आले. यासाठी मध्यरात्री दोन वाजता निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, आगार प्रमुख एस.बी. खडसे यांनी तातडीने उपाययोजना करून रात्रीच एका बसची व्यवस्था केली. या शिवाय सोमवारी जळगाव, अमळनेर आगारातून प्रत्येकी एक व भुसावळ येथून तीन जादा बसेस् सोडण्यात आल्या. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष वार्यावर....जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असताना आपत्ती नियंत्रण कक्षाने सतर्क राहणे गरजेचे आहे, मात्र जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात आलबेल स्थिती दिसून आली. २४ तास कर्मचारी नियुक्त असावे, असे असतानाही सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजेपासून आठ वाजे पर्यंत येथे कोणीच नव्हते. याबाबत माहिती घेतली असता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यालयीन कर्मचारी होते. त्यानंतर येणारे कर्मचारी येण्यापूर्वीच ते निघून गेल्याचा गंभीर प्रकार येथे दिसून आला. रात्री येणारे कर्मचारी सव्वा आठ- साडे आठ वाजता येतील अशी माहिती मिळाली. मात्र या दोन तासात कोणीच नसल्याने जिल्ह्यात काही आपत्ती ओढावल्यास कोठे संपर्क साधावा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. दूरध्वनी करुनही अधिकारी, कर्मचारी येथे नव्हते.