शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

अपघातानंतर कुंकळ्ळीत प्रक्षोभ

By admin | Published: May 05, 2015 1:22 AM

अपघातात युवक ठार : संतप्त जमावाकडून पोलिसांना मारहाण; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडूनही पोलीस चार तास ओलीस

अपघातात युवक ठार : संतप्त जमावाकडून पोलिसांना मारहाण; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडूनही पोलीस चार तास ओलीस
कुंकळ्ळी : सावरकटा येथे पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या बॅरिकेडचा अंदाज न आल्याने दुचाकीची धडक ट्रकला बसून आंबावलीतील युवक जागीच ठार झाल्याने खवळलेल्या जमावाने पोलिसांना वेठीस धरले. यात एका पोलीस शिपायाला जबर मारहाण करण्यात आली, तर ट्रक व पोलीस व्हॅनची तोडफोड करण्यात आली. पंचनाम्यातील त्रुटींवर बोट ठेवत संतप्त जमावाने युवकाचे शव घटनास्थळी आणण्याची मागणी केली. पुन्हा पंचनामा करण्याची मागणी लोकांनी लावून धरल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अधिक कुमक मागवून व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून सुमारे चार तास चाललेला प्रक्षोभ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र ५0च्या आसपास असलेल्या जमावाने तितक्याच संख्येने उपस्थित असलेल्या पोलिसांना दाद दिली नाही. स्थानिक सरपंच, आमदारांसह वरिष्ठ पोलिसांनाही जमावाने धारेवर धरले. रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.
सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवाडा आंबावली येथील आलिटो फर्नांडिस (वय २७) हा युवक आंबावलीहून कुंकळ्ळीमार्गे आपल्या कामाला जात होता, तर एक मासळीवाहू ट्रक आंबावलीमार्गे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील फिश मिलमधे मासळी घेऊन जात होता. सावरकटा येथे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या बॅरिकेडचा अंदाज न आल्याने आलिटो याने आपली मोटारसायकल बाजूला घेतली असता, ट्रकची धडक त्याला बसली. ट्रकच्या पुढील चाकाखाली सापल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्या ठिकाणी लोक गोळा होउ लागल्याचे पाहून पोलिसांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह व त्याची मोटारसायकल तेथून हलविली. या कृतीला आक्षेप घेत स्थानिकांनी पोलिसांना जाब विचारला. पंचनाम्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून ट्रकचालकाला वाचविण्याचा पोलिसांचा डाव असल्याचा आरोप करून संतप्त नागरिकांनी युवकाचा मृतदेह घटनास्थळी आणण्याची मागणी केली. त्याचबरोबर पुन्हा पंचनामा करण्याची मागणी लावून धरत पोलिसांशी हुज्जत घातली.
दरम्यान, संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची तोडफोड केली. तसेच साध्या वेशातील पोलीस शिपायाला जबर मारहाण केली. या पोलिसाला उपचारांसाठी नेण्याकरिता आणलेल्या पोलीस व्हॅनवरही दगडफेक करत नुकसान केले. संतापलेल्या लोकांना कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक, मडगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. परेरा व आंबावलीचे माजी सरपंच डॉ. बाळे यांनी घटनास्थळी जाऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याही प्रयत्नाला यश आले नाही. लोकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूकही खोळंबली. शेवटी खवळलेल्या जमावाला काबूत आणण्यासाठी अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली. मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, मायणाचे निरीक्षक हरीष मडकईकर व पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाने आलिटो याचा मृतदेह घटनास्थळी आणण्याची मागणी करत पोलिसांशी हुज्जत घातली. जमावाने कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक रामा आसरे व उपनिरीक्षक चव्हाण यांनाही धक्काबुक्की केली.
संतप्त जमावाने मासळीवाहू ट्रकच्या टायरातील हवा काढून ट्रक हलविण्याचा पोलिसांचा प्रयत्न उधळून लावला. काहींनी ट्रकला आग लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो यशस्वी होउ दिला नाही. सुमारे चार तास चाललेला प्रक्षोभ आटोक्यात आणण्यासाठी शेवटी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र संतापलेल्या लोकांनी उशिरापर्यंत ठाण मांडून पोलिसांच्या नाकी दम आणला.
या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक शिरगू शेख याला अटक केली आहे. उशिरापर्यंत पोलीस जमावाला समजविण्याचा प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-10
कॅप्शन: अपघातात सापडलेला ट्रक व मोटारसयकल.
ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-1३
पोलिसांशी हुज्जत घालताना जमाव.

.......................................


मोटरसायकल व मासळीवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टक्करीत यमाहा चालक आलिटो फेर्नाडिस (२७) राहणारा चिंचवाडा आंबावली हा जागीच ठार झाला.हा अपघात आज दुपारी तीनच्या दरम्यान झाला.यामाहा चालक मयत आलिटो फेर्नाडिस हा आंबावलीहून कुंकळ्ळी मार्गे आपल्या कामाला जात होतो.तर मासळीवाहू ट्रक कुंकळ्ळी आंबावली मार्गे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत फिश मिलमधे मासळी घेऊन जात होता.सावरकटा रस्त्यावर पोलिसानी वाहानावर ताबा ठेवण्यासाठी मधोमध बेरिकेट(आडथळा) ठेवला होता तो त्या दुचाकी चालकाला नजरेस पडला नसावा या बेरिकेटला चुकविण्याच्या नादात समोरून येणा-या मासळी वाहू ट्रकच्या पुढच्या चाकात सापडला व घटणास्थळीच गत प्राण झाला. रात्री उशिरापर्यत या भागात तणाव होता.

कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक, मडगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. परेरा व आंबावलीचे माजी सरपंच डॉ. बाळे यांनी घटनास्थळी जाऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याही प्रयत्नाला यश आले नाही.

कुंकळ्ळी पोलिसानी या अपघाताचा योग्य पंचनामा न करतां मयताचे शव व अपघातात सापडलेली यामाहा गाडी थेथून तातडीन काढल्यामूळे आंबावली येथील संतप्त जमावाने पोलिसाना सुमार चारतास वेठीस धरले. संतप्त जमावाने पोलिसांवर हला करून एका साद्या वेशातील पोलिसाला जबर मारहाण केली.कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे पोल्सिअ निरिक्षक राम आसरे व मोजक्याच पोलिसांशी आंबावली येथून आलेल्या जमावाने हुजत घालून लोकाना न कळवता नेलेले शव पुन्हा त्या ठिकाणी आणून लोकांस्मोर पंचनामा करण्याची मागणी करीत सुमार चार तास रस्त्या रोखून धरून गोंधळ घालता.संतप्त जमावाने अपघातात सापडलेल्या मासळीवाहू टर्कची तोदफोड केली व एका पोलिस शिपायाला जबर मारहाण केली. जमावाच्या तावडीतून पोल्सिअ शिपायाला घेऊन जाणा-या पोलिस जिपवरही लोकानी दगडफेक करून पोलिस जीप फोदली.कुंकळ्ळी पोल्सिआनी प्रकरण हाता बाहेर जात असल्याचे पाहून आणखी पोल्सिअ कुमक मागवुन घेतली ,मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुदेश नाईक,मायणा पोलिस स्थांकाचे पोलिस निरिक्षक हरीष मडकईकर व पोलिस उपाधिक्षक मोहन नाईक अतिरिक्त पोलिस कुमक घेऊन घटणास्थळी दाखल झाले मात्र जमाव मयत आलिटो याचेस हव घटणास्थळी आणण्याची मागणी करीत पोलिसांशी हुजत करीत राहिले.जमावाने पोल्सिअ निरिक्षक रामा आसरे,उपनिरिक्षक चव्हाण यानाही धकाबुकी केली.जमावाने मासळीवाहू ट्रकाच्या टायारातील हवा काडून ट्रक हलविण्यास मजाव केला.सुमार चार तास चाललेला ह तमाशा थांबविण्यास पोलिसाना पूर्नपणे अपयश आले.संद्याकाळी उशीरा पर्यंत जमाव रस्त्यावर ठाण माणून होता. जमावाने गाडीला आग लावण्याची तयारी कीले होती.पोलिसानी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांद्याही फोडल्या मात्र असे असतानाही पोलिस जमावाला पांगविण्यास अपयशी ठरले.आंबावली येथील सुमार पन्नास जणाच्या जमावाने पन्नासाच्यावर असलेल्या पोलिसाना सुमार चार तास ओलीस ठेवले जमावाने पोलिसाना घटणास्थळा पासून हलण्यास मजाव केला. या घटणे नंतर या भागात वातावरण तंग बनले होते.या अपघाताचा पंचनामा करण्यासाथी आलेले पोलिस शायक उपनिरिक्षक वेळीप यानी जणून बुजून ट्रक मालकाला वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पंचनामा केल्याचा आरोप जमाव करीत होता.या प्रकरणी पोलिसानी ट्रकचे चालक शिरगू शेक याल अटक केली आहे.उशीरा पर्यंत पोलिस जमावाला समजविण्याचा प्रयत्नकरीत होते. संकटाच्या वेळी पोलिसाना जमावाचा सामना करण्याचे धाडस होत नाही हे या घटणेने पुन्हा एकदां सिद्ध केल्याचे लोक बोलत आहेत. (प्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-10
कॅप्शन: अपघातात सापडलेला ट्रक व यामाहा मोटरसयकल.
ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-1३
पोलिसांशी हुज्जत घालताना जमाव