शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:23 AM

कर्नाटकमधील काँग्रेस व जनता दल (एस)च्या संधीसाधू आघाडी सरकारला देशसेवा करण्यात रस नसून त्यांना फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे, अशी कडक टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केली.

नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेस व जनता दल (एस)च्या संधीसाधू आघाडी सरकारला देशसेवा करण्यात रस नसून त्यांना फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे, अशी कडक टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केली.विष पचवत आघाडी सरकार चालवत आहे असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी रविवारी सांगितले तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला व डोळ््यात अश्रू तरळले होते. त्या अनुषंगाने जेटलींनी म्हटले की, देशाला नरेंद्र मोदींसारख्या निश्चयी नेत्याची आवश्यकता आहे, कुमारस्वामी यांच्यासारख्या ट्रॅजिडी किंगची नव्हे! जेटली यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, कुमारस्वामींबरोबर जसे काँग्रेस वागत आहे, अगदी तशीच स्थिती त्यांनी चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल यांचीही केली होती. मोदी व त्यांच्या पक्षाला सत्तेपासून लांब ठेवण्याच्या संकुचित हेतूपायीच काँग्रेस व जनता दल (एस)ने संधीसाधू युती केली.जगात सर्वात वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा प्रमुख नेता ‘बिचारा' असून चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जेटली यांनी म्हटले आहे की, समजा भारताचे पंतप्रधान असे कॅमेरासमोर अश्रू गाळू लागले, आपल्याला होणाऱ्या त्रासातून सुटका करुन घेण्याची भाषा करु लागले तर यूपीए सरकारच्या दुसºया कारकिर्दीत झालेल्या धोरण-लकव्यापेक्षा ही स्थिती गंभीर असेल.>सेक्युलॅरिझममुळेच जेडीएसला पाठिंबा : खर्गेसेक्युलॅरिझमवर काँग्रेस व जेडीएसचा विश्वास असल्यानेच या दोन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन होऊ शकले. या गोष्टीकडे कुमारस्वामी यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे. कोणत्याही समस्येला सामोरे जायचे असते. त्याविषयी जाहीरपणे तक्रार करत बसले तर सेक्युलर पक्षांना पाठिंबा देणाºया लोकांपर्यंत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीचा कुमारस्वामींनी निडरपणे सामना करायला हवा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली