शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सर्वात वेगवान 'ट्रेन 18'चे नामकरण; जाणून घ्या नवीन नाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 10:06 AM

'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस', असे नाव देण्यात आले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. 

नवी दिल्ली : 'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस', असे नाव देण्यात आले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, "ट्रेन 18 ची डिजाईन आणि निर्मिती भारतात केली आहे. लवकरच ही ट्रेन लोकांच्या सेवेसाठी रुळावर धावणार आहे. या ट्रेनसाठी लोकांनी अनेक नावे सुचवली होती. परंतु आम्ही 'वंदे भारत एक्स्प्रेस' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे." 

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर 'वंदे भारत एक्स्प्रेस' दिल्ली ते वाराणसी धावणार आहे. ही रेल्वे 160 किमी प्रति तास इतक्या वेगाने धावेल. ही भारतातील पहिली इंजिन नसलेली रेल्वे असून पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण आहे.

तसेच, ही रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये 16 कोच आहेत. एका कोचमध्ये 128 लोक बसतील अशा आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

देशी बनावटीची हायस्पीड 'ट्रेन 18'कोटा ते सवाई माधोपूर या भागात ट्रेन 18 ची चाचणी घेण्यात आली. सध्याच्या घडीला गतीमान एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनचा वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही ट्रेन आग्रा ते दिल्ली दरम्यान धावते. मात्र ट्रेन 18 ने गतीमान एक्स्प्रेसला मागे टाकले. ट्रेन 18 ची निर्मिती मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली आहे. या ट्रेनची तांत्रिक चाचणी मुरादाबाद ते बरेली दरम्यान घेण्यात आली होती. या चाचणीत ही ट्रेन उत्तीर्ण झाली होती. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे