शहडोल - औरंगाबादरेल्वेअपघातात मध्य प्रदेशातील १६ मजुरांचा जीव गेला. या दुर्घटनेत सर्वाधिक मजूर शहडोल येथील होते. शहडोल येथील अंतौली गावातील मजुरांचा मृत्यू झाला. रविवारी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी गावात प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी पोहचले. अधिकाऱ्यांनी मृतकांच्या नातेवाईकांशी भेट घेऊन सात्वन केलं.
या भेटीदरम्यान सरकारकडून मृतकाच्या नातेवाईकांना देण्यात आलेली रक्कम अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती त्यावेळी एका क्षणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. मृतक मजूर दीपक यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, आम्ही पैसे घेऊन काय करणार? दीपक यांचा एकलुता एक मुलगा आहे त्याला शिक्षण देऊन नोकरी द्या, जेणेकरुन तो मजूर बनणार नाही. नातेवाईकांचे हे शब्द ऐकून अधिकारीही भावूक झाले.
अंत्यसंस्कारानंतर रविवारी अधिकारी अंतौली गावात मृतकांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी पोहचले. अधिकाऱ्यांना पाहून नातेवाईक दु:खी झाले. दीपक यांचे वडील दिड वर्षाच्या मुलाला घेऊन बसले होते. हा मुलगाच दिपक याचा एकमेव आधार होता. याने कधीही गाव सोडून मजुरी करायला जावं असं आम्हाला वाटत नाही. अधिकाऱ्यांनी त्यांना चेक देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तो नाकारला. अधिकाऱ्यांच्या समजावल्यानंतर तो चेक दिपकच्या वडिलांनी घेतला.
आर्थिक अडचणीत असलेला दिपक महाराष्ट्रात मजुरीसाठी गेला होता. तोच माझा आधार होता. त्याचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. आता मदत करण्यासाठी अधिकारी हेच होते ज्यांनी आमची २ एकर जमीन असल्याने बीपीएल कार्ड बनणार नाही सांगितले. ज्यामुळे आम्हाला रेशन मिळत नव्हतं. रोजगार असता तर दिपक मजुरीसाठी गेला नसता असं दिपकच्या वडिलांनी सांगितले.
अंतौली गावात अपघातानंतर ३ दिवस उलटले तरीही शांतता पसरली आहे. कोणत्याही घरात चूल पेटली नाही. प्रशासकीय अधिकारी आणि नातेवाईक येऊन मृतकाच्या कुटुंबाला धीर देतात. अनेकांचे मृतदेहाचे तुकडे मिळाले आहेत त्यांना गावातच दफन करण्यात आलं आहे. या गावातील प्रत्येक चेहऱ्यावरचं हास्य या दुर्घटनेमुळे हिरावून घेतलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोना संबधित रहस्यमय रोगाचा लहान मुलांना धोका; अमेरिकेसह अनेक देश चिंतेत!
मजुरांच्या मदतीला धावली ‘लालपरी’; आतापर्यंत ८ हजार जणांना पोहचवलं इच्छितस्थळी
आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट