गाडी लोहार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद
By admin | Published: March 14, 2016 12:21 AM
जळगाव : गाडी लोहार समाज मंडळ व साप्ताहीक विश्वकर्मा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी आयोजित सर्व शाखीय लोहार समाजातील वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये ८० मुली व १२६ मुलांनी परिचय दिला. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील असंख्य समाज बांधव या वेळी उपस्थित होते.
जळगाव : गाडी लोहार समाज मंडळ व साप्ताहीक विश्वकर्मा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी आयोजित सर्व शाखीय लोहार समाजातील वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये ८० मुली व १२६ मुलांनी परिचय दिला. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील असंख्य समाज बांधव या वेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय विराट महासंघ मंचचे अध्यक्ष व्ही.के. वर्मा होते. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, प्राचार्य अनिल लोहार, रमेश विश्वकर्मा, सदाशिवराव हिवलेकर, दिलीप थोरात, रमेश लोहार, भरत लोहार, शेखर लोहार, सुरेश सूर्यवंशी, जितेंद्र चव्हाण, चंद्रशेखर चोपडेकर आदी उपस्थित होते. परिचय पुस्तिकेचे प्रकाशन...उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ४५५ वधू व ५२४ वर यांची फोटोसह माहिती असलेल्या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. रोटी-बेटी व्यवहार करणे सोयीचे....व्ही.के. विश्वकर्मा यांनी आपल्या मनोगतात सर्व लोहार समाजातील पोट जाती यांना एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरूवात झाली असून हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे सांगितले. भविष्यात अशा मेळाव्यांच्या आयोजनाने सर्व समाज एकत्र येऊन रोटी-बेटी व्यवहार करणे सोयीचे जाणार असल्याचे ते म्हणाले. आमदार भोळे यांनीही अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. लोहार समाजाचे आराध्य दैवत विश्वकर्मा यांची जयंती राज्य स्तरावर साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून समाज कार्यालयासाठी आठ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य अनिल लोहार, सदाशिवराव हिवलेकर, नारायण लोहार यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक लक्ष्मणकुमार सांगोरे यांनी केले. सूत्रसंचालन संजय लोहार यांनी केले तर अमित गोराणे यांनी आभार मानले. मुकुंदा गोहील, विलास सांगोरे, संजय राठोड, सुनील लोहार, अतुल सिद्धपुरे, रवींद्र लोहार, शिवशंकर लोहार, विष्णू लोहार, भूषण सांगोरे, पंकज सूर्यवंशी व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.