भोपाळ - मध्य प्रदेशच्या सिंगरोली जिल्ह्यात दोन रेल्वे मालगाडीची समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धावे घेतली आहे. तसेच, तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
एनटीपीसीच्या कोळसा वाहून नेणाऱ्या दोन मालगाड्यांची टक्कर झाल्याने ही दुर्घटना घडली. बैढन ठाणा क्षेत्रातील रिहन्द नगर येथून एक मालगाडी कोळसा वाहून नेत होती. तर, दुसऱ्या दिशेने रिकामा मालगाडी येत होती. या दोन्ही मालगाड्यांची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाड्यांचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या रेल्वेगाडीत अडकून 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे अपघात झाला आहे.