कानपूरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. मध्यरात्री कपलिंग तुटल्याने गोरखपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसचे डबे वेगवेगळे झाले. त्यामुळे सुमारे चार तास ट्रेन पुखरायां स्थानकात उभी होती. नंतर काम करून ट्रेन रवाना करण्यात आली. कपलिंग अंतर्गत ट्रेनचे दोन डबे एकमेकांना जोडले जातात. काल रात्री हे कपलिंग तुटल्याने कुशीनगर एक्स्प्रेसचे काही डबे इंजिनपासून वेगळे झाले.
एका डब्याचे कपलिंग तुटल्याने डब्बे ट्रेनपासून वेगळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या डब्याचे कपलिंग तुटले तो डब्बा काढून दुसरा डबा जोडण्यात आला आणि सुमारे चार तासांनंतर ट्रेन रवाना करण्यात आली. 8 वर्षांपूर्वी याच स्थानकावर (पुखरायां) ट्रेन उलटून भीषण अपघात झाला होता. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.
कुशीनगर एक्स्प्रेस गोरखपूरहून मुंबईला जात होती. त्यानंतर रात्री 3 वाजण्याच्या सुमारास कानपूरच्या पुखरायां स्थानकापूर्वी ही घटना घडली. ट्रेनच्या S-2 कोचचं कपलिंग तुटल्यामुळे तो ट्रेनपासून वेगळा झाला. रेल्वे स्थानकावर पुढचे डबे उभे राहिले तर काही मागचे डबे तिथेच राहिले.
मध्यरात्री एक्स्प्रेसचे दोन भागात विभाजन झाल्याचं पाहून स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. यानंतर इंजिनच्या मागे असलेली ट्रेनही स्टेशनच्या दुसऱ्या ट्रॅकवर आणण्यात आली. त्यानंतर एस-2 कोचमधील प्रवाशांना दुसऱ्या कोचच्या सीटवर बसवून इच्छित स्थळी पाठवण्यात आले.
गोरखपूरहून ट्रेन सुटल्यावर त्याची रीतसर तपासणी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित होतो. ट्रेन परीक्षक प्रत्येक कोचचे कपलिंग तपासतात. मग वाटेत ट्रेनचे कपलिंग कसे तुटले? हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणारी ही एक्स्प्रेस गाडी वेगात असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.