ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:25 PM2024-05-28T18:25:03+5:302024-05-28T18:48:47+5:30

भोपाळमध्ये ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे.

train seat not available even after booking bhopal district consumer commission imposed fine on railways | ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!

ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!

भोपाल : अनेक जण रेल्वेने प्रवास करतात. यासाठी काहीजण गर्दीमुळे आधीच रेल्वेचे तिकीट बुकिंग करतात. अशाच एका प्रवाशाने आधीच तिकीट काढून आपली सीट आरक्षित केली होती. मात्र, त्याला ती सीट मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशाने ग्राहक आयोगात तक्रार केली. त्यामुळे ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना भोपाळमधील आहे. 

भोपाळमध्ये ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका रेल्वे प्रवाशाच्या तक्रारीच्या आधारे ग्राहक आयोगाने हा दंड ठोठावला आहे. तक्रारदार रेल्वे प्रवाशाने दिल्ली ते हबीबगंज जाण्यासाठी ट्रेनमध्ये सीट बुक केली होती. प्रवासादरम्यान प्रवाशाला बुक केलेली सीट मिळाली नाही. त्यानंतर पीडित प्रवाशाने भोपाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.

भोपाळमधील कोलार रोड येथील रहिवासी मनोज शर्मा यांनी १४ डिसेंबर २०२० रोजी IRCTC ॲपद्वारे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन ते हबीबगंजसाठी   तिकीट बुक केले होते. त्याला ट्रेन क्रमांक ०२१५६ च्या डब्यात २१ क्रमांकाची सीट मिळाली. जेव्हा तो ट्रेनच्या डब्याजवळ पोहोचला, तेव्हा त्याला समजले की, ही सीट आपल्याला देण्यात आली नाही, त्यामुळे मनोज शर्मा यांनी उभे राहून प्रवास केला.

या प्रवासादरम्यान मनोज शर्मा यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पूर्ण रक्कम भरूनही जागा न मिळाल्याने मनोज शर्मा यांनी जिल्हा ग्राहक आयोग, भोपाळ यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मनोज शर्मा यांनी सर्व कागदपत्रे सादर करून अर्ज केला. दरम्यान, तब्बल चार वर्षांनंतर ग्राहक आयोगाने याप्रकरणी निकाल देत रेल्वेला हा दंड ठोठावला आहे.

मनोज शर्मा यांनी भोपाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे १८ डिसेंबर २०२० रोजी तिकिटाची रक्कम २५७.७० रुपये, शारीरिक, मानसिक त्रास आणि वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी १० हजार रुपये मिळण्यासाठी वकिलामार्फत अर्ज केला होता. सीटीआय हबीबगंज आलोक श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची चौकशी केली. 

आलोक श्रीवास्तव यांनी ग्राहक आयोगाला सांगितले की, जी ६ डब्यात तिकीट तपासणारा कर्मचारी नव्हता. तसेच, सहा डब्यांमध्ये एकही जागा रिकामी नव्हती. यानंतर, निर्णय देताना ग्राहक आयोगाने सांगितले की, डीआरएम दिल्ली आणि डीआरएम भोपाळ यांनी तक्रारदाराला २५७ रुपये तिकीटाची रक्कम द्यावी. तसेच दहा हजार रुपये मानसिक त्रासासाठी आणि तीन हजार रुपये खटल्याचा खर्च म्हणून द्यावेत.

Web Title: train seat not available even after booking bhopal district consumer commission imposed fine on railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.