शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 7:17 PM

पाटण्याचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी पीएफआयची आरएसएसशी तुलना केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

पाटणा: बिहारची राजधानी पाटण्याचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी पीएफआयची(PFI) आरएसएसशी(RSS) तुलना केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. एसएसपी म्हणाले की, 'ज्याप्रकारे आरएसएसच्या शाखेत स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे पीएफआय आपल्या लोकांना प्रशिक्षण देते.' त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली असून, ढिल्लन यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. 

एसएसपीच्या वक्तव्यावर भाजप नाराजआरएसएसची पीएफआयशी तुलना करण्यावरुन भाजपचे प्रवक्ते अरविंद कुमार सिंह म्हणाले की, पाटणाचे एसएसपी पीएफआयच्या प्रवक्त्यासारखे बोलत आहेत. त्यांना एसएसपी पदावरून हटवण्यात यावे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि आमदार हरीश भूषण ठाकूर म्हणाले की, एसएसपीच्या वक्तव्यातून त्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून येते. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी अन्यथा सरकारने त्यांना बडतर्फ करावे.

एसएसपीच्या समर्थनार्थ आरजेडी आणि एचएएमराजदने पाटणा एसएसपीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आरजेडी पाटणा यांनी ट्विट केले की, हे लोक शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली आपला प्रचार आणि द्वेष पसरवतात. या संघाच्या कार्यपद्धतीबद्दल पाटण्याचे एसएसपी अगदी बरोबर बोलले आहेत. ते दंगल, मॉब लिंचिंग आणि इतर घटना घडवून आणतात. त्यांची लोक सामाजिक सलोखाविरोधी कृत्ये करतात.

दुसरीकडे, एचएएमचे प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान म्हणाले की, एसएसपीला जाणीवपूर्वक वादात ओढले जात आहे. इस्लामिक स्टेटबद्दल बोलणे हा गुन्हा असेल, तर हिंदु राष्ट्राची वकिली करणे योग्य आहे का? इस्लामिक राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते, तर मग हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्यांना मुक्त सोडले जाते.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBiharबिहारPoliceपोलिसBJPभाजपा