नवी दिल्ली- ‘सीबीआय’चे हंगामी संचालक म्हणून बुधवारी सकाळी पदभार स्वीकारताच एम. नागेश्वर राव यांनी १३ प्रमुख अधिका-यांच्या बदल्या केल्या किंवा काहींकडे अतिरिक्त कार्यभार दिला. विशेष संचालक राकेश अस्थाना व इतरांविरुद्धच्या लाचखोरी व ‘खंडणी वसुली’च्या आरोपांची चौकशीवर देखरेख करणाºया अधिकाºयांचाही बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.राकेश अस्थाना यांच्यावरील आरोपांची चौकशी करणारे अजय बस्सी यांना थेट पोर्ट ब्लेअर येथे पाठविण्यात आले आहे. अस्थाना यांच्याविरुद्धच्या तपासाचे पर्यवेक्षण करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिट-३चे उपमहानिरीक्षक मनोज कुमार सिन्हा यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. त्यांच्याजागी चंदीगड एसीबीचे प्रमुख तरुण गऊबा यांना आणण्यात आले.या बदल्यांनंतर आता अस्थाना यांच्याविरुद्धच्या आरोपांचा तपास करणाºया तपासी तुकडीत उपमहानिरीक्षक तरुण गऊबा, अधीक्षक सतीश डागर व सहसंचालक व्ही. मुरुगेशन यांचा समावेशआहे.>सीबाआयमध्ये अशा केल्या बदल्या1. मनीषकुमार सिन्हा, डीआयजी, एसी३ व बीएस अॅण्ड एफसी, नवी दिल्ली. (नागपूर एसीबीमध्ये बदली)2. तरुण गऊबा, डीआयजी, एसीबी, चंदीगड. (मनीष सिन्हा यांच्या जागी एसी३ दिल्लीला बदली)3. जसबीर सिंह, डीआयजी, स्पेशल क्राईम. (एचओबी बीएस अॅण्ड एफसीचा अतिरिक्त पदभार)4. अनीस प्रसाद, डीआयजी, सर्व्हेलन्स युनिट. (सर्व्हेलन्स युनिट१मध्ये प्रशासन व कार्मिक विभागात बदली)5. के.आर. चौरसिया, एचओडी, इकॉनॉमिक आॅफेन्सेस-१. (डीआयजी, सर्व्हेलन्स युनिट-१चा अतिरिक्त पदभार)6. राम गोपाल, एचओबी, एससीबी, चंदीगड.(एचओबी, एसीबी, चंदीगडचा अतिरिक्त पदभार)7. सतीश डागर, एसपी, इकॉनॉमिक आॅफेन्सेस-३. (एसी-३मध्ये बदली)8. ए.के. बस्सी, डेप्युटी एसपी, सीबीआय, एसी-३. (पोर्टब्लेअर अॅन्टिकरप्शनमध्ये बदली)9. एस.एस. गुर्म, अॅडिशनल एसपी, सीबाआय एसी-३ दिल्ली. (एसीबी जबलपूरमध्ये बदली)10. अरुणकुमार शर्मा, जेडी, पॉलिसी. (आता जेडी एमडीएमए)11. ए. साई मनोहर, हेड, झोन/जेडी चंदीगड, विथ हेडक्वॉर्टर दिल्ली. (एसआयटी व टीएफसी झोनचा अतिरिक्त पदभार)12. व्ही. मुरुगेसन, हेड, झोन एसी-२ (हेडक्वॉर्टर). (एचओझेड/जेडी एसी-१ (हेडक्वॉर्टर)चा अतिरिक्त पदभार)13. अमितकुमार, डीआयजी, एचओबी, ईओ-३. (जेडी पॉलिसी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार)>आलोक वर्मा यांची सुप्रीम कोर्टात धावआपल्याला रजेवर पाठवून नागेश्वर राव यांना ‘सीबीआय’चे हंगामी संचालक नेमण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध आलोक वर्मा यांनी बुधवारी तातडीने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.सकाळी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाचे कामकाज सुरू होताच आलोक वर्मा त्यांची कैफियत घेऊन ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांच्यासोबत उभे राहिले.या निर्णयाने अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुरू असलेल्या तपासात विघ्ने येणार असल्याने न्यायालयाने तातडीने हस्तक्षप करावा, अशी त्यांची विनंती होती.सरन्यायाधीशांनी विचारणा केल्यावर आलोक वर्मा यांनी सांगितले की, रजेवर पाठविण्याचा हा आदेश सकाळी ६ वाजता कळवण्यात आला. हे सर्व एवढे अनपेक्षितपणे घडले की, अजून रीतसर याचिकाही तयार करता आलेली नाही. यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, दिवसभरात याचिका तयार करून ती दाखल करा. शुक्रवारी ती सुनावणीसाठी लावली जाईल.तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा रद्द करावा यासाठी विशेष संचालक अस्थाना दिल्ली उच्च न्यायालयात गेल्यानंतर संचालक वर्मा यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जावे, हे लक्षणीय आहे. रजेविरुद्ध अस्थाना हे मात्रबुधवारी सायंकाळ पर्यंत न्यायालयात गेलेनव्हते.
अस्थानांवरील आरोपांचा तपास करणाऱ्या अधिका-यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:07 AM