शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
3
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
5
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
6
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
7
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
8
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
10
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
11
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
12
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
13
चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम
14
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
15
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित
16
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
17
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
18
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
19
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
20
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?

वडनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट

By admin | Published: April 23, 2017 12:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी एके काळी जिथे चहा विकायचे, त्या रेल्वे स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनला नवे रूप देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी एके काळी जिथे चहा विकायचे, त्या रेल्वे स्टेशनचा लवकरच कायपालट होणार आहे. वडनगर रेल्वे स्टेशनला नवे रूप देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी येथे शुक्रवारी केली. याशिवाय मोदी वडनगरमध्ये ज्या घरात राहात होते, त्याचा ताबा आता दुसऱ्या कुटुंबाकडे असला, तरी ते विकत घेऊन तिथे संग्रहालय बनवण्याचा प्रयत्न तेथील पर्यटक कंपन्यांनी चालविला आहे. त्या संग्रहालयाचे नेमके स्वरूप कसे असेल, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते घर म्हणजे पर्यटन स्थळ बनवून, तिथे अधिकाधिक पर्यटकांना आणायचे, असा पर्यटक कंपन्यांचा मानस आहे. अर्थात, तिथे राहणाऱ्या कुटुंबाने त्या घराचा ताबा सोडला, तरच ते शक्य होईल. मनोज सिन्हा म्हणाले की, या निधीतून वडनगर रेल्वे स्टेशनचा,तसेच आसपासच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. मोदी यांनी २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकाच्या प्रचारात आपण वडनगर रेल्वे स्टेशनबाहेर चहा विकायचो, असे सांगितले होते. त्यांचा जन्मही वडनगरमध्येच झाला होता. या प्रकल्पाची सविस्तर माहिती देताना अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दिनेश कुमार यांनी सांगितले की, मेहसाणा जिल्ह्यातील परिसरासहीत वडनगरचा विकास करण्यासाठी सुमारे १00 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातून वडनगर, मोधेरा आणि पाटण ही ठिकाणे विकसित करण्यात येतील. पर्यटन मंत्रालयाने स्टेशनचे रूप बदलण्यासाठी आतापर्यंत ८ कोटी रुपये दिले आहेत. (वृत्तसंस्था)मालवाहतुकीचे वेळापत्रक- प्रवासी गाड्यांप्रमाणेच लवकरच मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचेही वेळापत्रक लागू करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती मनोज सिन्हा यांनी दिली. सध्या मालवाहक गाड्यांचे वेळापत्रक नसल्याने त्यांची ये-जा कोणत्याही वेळेस सुरू असते.त्यामुळे आम्ही एक पथदर्शक प्रकल्प हाती घेतला असून, पहिल्या टप्प्यात तीन ते चार मालवाहक गाड्या वेळापत्रकानुसार चालतील. तो यशस्वी झाल्यानंतर, सर्व मालगाड्यांबाबत निश्चित वेळापत्रक तयार करण्यात येईल.